Options

Body Background:
Body text color:
Links Color:
CONTENT Color:
Color suggestions:
TOP/FOOTER COLOR:
T/F BG Color:
T/F BG opacity:
HEADER/BOTTOM COLOR:
H/B BG Color:
H/B BG opacity:
This panel is build only for demo purposes. It does not work well on IE
expand

    + (९१) ९३२६७६३६९२ Login

    भिलवडीचा इतिहास

    भिलवडीचा इतिहास भिलवडी हे सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचे प्रगतशिल गाव आहे. भिलवडीस ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षिणक परंपरा लाभली आहे. १९३९ साली झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहमुळे भिलवडी गाव इतिहासात अजरामर झाले.

    कृष्णा घाट

    कृष्णा घाट भिलवडी मध्ये कृष्णा नदीतीरी भिलवडीच्या सोंदर्यात आणि वैभवात भर घालणारा असा घाट आहे. हा घाट पटवर्धन सरकारांच्या काळात बांधण्यात आला आहे जो आज प्रांत मजबूत स्थिथीमध्ये जशाचा तसा आहे.

    शैक्षणिक भिलवडी

    शैक्षणिक भिलवडी शिक्षण हि आजच्या काळातील सर्वात महत्वाची गरज आहे. भिलवडी मध्ये शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत म्हणजेच अगनवाडी पासून ते उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत.

    कृषी व्यवसाय

    कृषी व्यवसाय भिलवडी गाव बाराम्हीने वाहणाऱ्या कृष्ण नदीच्या तीरावरती बसले असल्याने शेतीसाठी लागणारे वातावरण आणि पाणी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे येथील शेती चांगल्या प्रमाणात उत्पन देते.

    "आले भिल्लवडी ग्रामासी | भुवनेश्वरी सनन्निध | कृष्णा पश्चिम तटाकेस | औदुम्बर वृक्ष परियेसी | श्रीगुरु राहिले गुप्तेंसी | एकचित्ते परियेस ||"

    भिलवडीत क्रीडांगण आणि बागेची गरज आहे का ?

    होय - Yes - 93.8%
    नाही - No - 6.3%

    Total votes: 16

    वेबसाईट बद्दल आपला अभिप्राय, आपल्या सूचना आणि भिलवडी संदर्भात अधिक माहिती  आम्हाला जरूर कळवा. खालील इमेल वर : pradip@bhilawadi.com / info@layersinfo.com

    डेवलपमेंट टीम // लेयर्स इन्फोटेक

    वेबसाईट संदर्भात अधिक माहितीसाठी पुढील नंबर्स वरती संपर्क करू शकता : राहुल ( ९०२११२४५०७ ), अमित (९०२१९७८५४५ ),  प्रदीप (९३२६७६३६९२)

    अधिक माहितीसाठी // संपर्क करा

    नवीन सदस्य

    ताज्या बातम्या

     

     आम्ही भिलवडीकर फौंडेशन प्रस्तुत  
    !! भिलवडी फेस्टिवल  !!
    दि . १६ फेब्रुवारी २०१३ ते  १९ फेब्रुवारी २०१३

    वातावरण अनुमान

    भिलवडीमध्ये आपले स्वागत आहे ...

    भिलवडी हे सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचे प्रगतशिल गाव आहे. भिलवडीस ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षिणक परंपरा लाभली आहे. १९३९ साली झालेल्या  वैयक्तिक सत्याग्रहमुळे भिलवडी गाव इतिहासात अजरामर जाले. तसेच स्वातंत्र्य लड्यामधे  येथील स्वातंत्र्य सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अश्या रितीने स्वातंत्र्यलड्यामधे महत्वपूर्ण भूमिका पार पाडणारा व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या भिलवडी गावाचा विकास स्वातंत्र्या नंतर झाला. त्याचाच परिणाम म्हणून सामाजिक व आर्थिक, राजकीय, शैक्षणिक बदल या गावात घडून आले. भिलवडी हे गाव सांगली जिल्ह्यातील  एक महत्वात्चे गाव असल्याने सांगली जिल्ह्यात हे गाव प्रसिद्ध आहे. भिलवडी हे सांगली पासून २५किमी अंतरावर व भिलवडी स्टेशन पासून पश्चिमेस ३.५किमि अंतरावर आहे. भिलवडीचे उत्तर अक्षांश १६°५९'१९.७६" व पूर्व रेखांश ७४°२८'१०.९५" इतके आहे. भिलवडी गावाचे एकुण क्षेत्र २.३९२ हेक्टर इतके आहे. भिलवडी गावातून कृष्ण नदी वाहते. गावाची पूर्वपश्चिम लांबी २३०० फुट व दक्षिणोत्तर रुंदी २००० फुट आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार आहे. या गावाखाली सभोवार १२ वाडया आहेत. त्यापैकी ८ वाडयाना वस्ति असून बाकी सर्व नष्ट झाल्या आहेत.  

    भिलवडीला प्राचीन इतिहास आहे. गुरुचरित्र ग्रंथात भिलवडीचा  उल्लेख आढळून येतो. मध्ययुगीन काळी भिलवडीवर विजापुरकरांचे वर्चस्व होते. सन १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा प्रदेश काबीज केला. सन १६७४ ,मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी या भागावर मराठ्यांचे वर्चस्व होते.  भिलवडीला खरे महत्व पेशवे काळात आले होते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सन १७७९ मध्ये परशुराम भाऊ पटवर्धन यांनी कृष्णा नदीवरील बांधलेला घाट. या घाटाने २३३ वर्षे पूर्ण केली आहेत. वास्तुशिल्पाचा वैशिष्ट्य पूर्ण नमुना असलेला असा हा घाट कृष्णेच्या उगमापासून कोठेही आढळत नाही.

    भिलवडीचा विकास होण्यामध्ये राजकीय नेतृत्वाबरोबरच ग्रामपंचायतीच्या सहभागाचाही विशेष उल्लेख करावा लागेल. विविध शासकीय योजना राबविण्यात ग्रामपंचायतीचे योगदान दिसून येते. ग्रामपंचायतीच्या कार्यामुळेच भिलवडीस विविध योजनांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. भिलवडी गावास संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, दलित योजना सुधारणा पुरस्कार मिळाले आहेत.

    वेबसाईट ला भेट देणारे..

    आज
    काल
    चालू आठवड्यामध्ये
    मागील आठवड्यामध्ये
    चालू महिन्यामध्ये
    मागील महिन्यामध्ये
    एकूण भेटी
    833
    4335
    15944
    484362
    46461
    120770
    518618

    संत गाडगेबाबा स्वचता अभियान

    भिलवडीने संत गाडगेबाबा स्वचता अभियान (सन २००२-०३) जिल्हा स्थरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे.
    Read more →

    दलित वस्ती सुधारणा अभियान

    भिलवडी गावाने शाहू - फुले - आंबेडकर दलित वस्ती सुधारणा अभियान ( सन २००६-०७) जिल्हा स्थरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे.
    Read more

    निर्मल ग्राम योजना

    भिलावाडीने निर्मल ग्राम योजना (सन २००६-०७) जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे.
    Read more

    नविन ब्लॉग्स

    • 2011-12-23
      in भिलवडी
      पारंपारिक खेळ जपणे गरजेच आहे
      भिलवडी हे पारंपारिक गाव आहे. बऱ्याच परंपरा इथे पाहायला मिळतील. पण भिलवडीत पारंपारिक खेळांचा ऱ्हास होत आहे असे दिसून येत आहे. कब्बडी, खो-खो, विटी-दांडू, हुसके, लेझीम, झांज पथक यासारखे खेळ पूर्वी खेळले जायचे. पण अशे खेळ सध्या लुप्त होत आहेत. भिलवडीचा इतिहास पहिला असता अनेक मोठे खेळाडू इथे होऊन गेले. या खेळांचे संगोपन करणे आज…
    • 2011-12-23
      in भिलवडी
      कृष्णा घाटाची चाललेली पडझड
      भिलवडी गावास कृष्णा घाटाची अभूतपूर्व अशी भेट मिळाली आहे. हा घाट पेशवेकालीन आहे ज्याला २३३ वर्षे पूर्ण झाली आहेत.हाच घाट कृष्णा नदीच्या रौद्ररूपापासून भिलवडीकरांचे रक्षण करत  आहे.  परंतु काही दिवसांपूर्वी कृष्णा घाटाचे काही दगड त्यांच्या जागेवरून हलले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे ते त्यांच्या जागेवरून हलत आहेत. हे दगड जर असेच हलू लागले तर काही काळाने घाटाचे…

    नविन ट्वीट्स

    फ्लिकर फोटो स्ट्रीम

    Scroll to top